नांदेड जिल्हा परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन साजरा
अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ

नांदेड, 31- नांदेड जिल्हा परिषदेत आज भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकता व अखंडतेची शपथ घेत देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्प करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना राष्ट्रीय एकता आणि अखंडतची शपथ देण्यात आली.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी. गीरी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख तसेच सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रीय एकता, सामाजिक ऐक्य आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने योगदान देण्याचा निर्धार केला



