Breking News : नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई -10 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड! 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या दक्ष डी.बी. पथकाने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या हाडामध्ये भीती निर्माण केली आहे. विशेष मोहिम “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत पोलिसांनी 10 मोटारसायकलींची चोरी उघड करत 5,20,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष तपास पथक राबविण्यात आले होते.
कारवाईचा थरार: 1 नोव्हेंबर 2025 रोजी हस्सापूर रोडवर संशयित इसम फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्या इसमाला पकडले असता, त्याची ओळख नवनाथ बालाजी वडजे (वय 23, रा. वडरवाडा, ता. मुखेड, जि. नांदेड) अशी पटली.
सखोल चौकशीत त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनींच्या 10 मोटारसायकली मिळाल्या. विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्या सर्व मोटारसायकली नांदेड ग्रामीण, वजीराबाद, नायगाव व धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणांहून चोरी केल्या होत्या.
जप्त मुद्देमाल: एकूण 10 मोटारसायकली, किंमत: अंदाजे 5,20,000/-
उघड झालेले गुन्हे: नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे 6 गुन्हे, वजीराबादचे 2 गुन्हे, नायगाव व धर्माबाद येथील प्रत्येकी 1 गुन्हा
या तपासात पोलीस उपनिरीक्षक सुनिल अ. भिसे व त्यांच्या डी.बी. पथकाची विशेष कामगिरी राहिली.



