देश विदेश

घुमान यात्रा नामदेव चरणी नतमस्तक : उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज घुमानला भेट

नांदेड – महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची हजुर साहिब ते अमृतसर ११ वी “घुमान यात्रा” १ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान मध्ये पोहचली. यात्रा नामदेव चरणी नतमस्तक झाली. उद्या चंदिगड व कुरुक्षेत्र ला जाणार आहे. दरम्यान आज २ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे घुमान ला भेट देत आहेत.

संत नामदेव महाराज यांनी मराठीची पताका थेट पंजाबपर्यंत नेली आणि पंजाब व महाराष्ट्रात बंधू भाव निर्माण केला. त्यांच्या या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानक साई फाऊंडेशन दरवर्षी “ना नफा ना तोटा” या पध्दतीने घुमान यात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे. नांदेड च्या लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचा कृपा आशीर्वाद घेऊन यात्रा पंजाबला आली आहे.

यात्रा नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष नांदेड येथील तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहा ने पंजाब मध्ये भ्रमण करीत आहे. यात्रा अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात नतमस्तक होऊन १ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान मध्ये पोहचली. तेथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नामदेव दरबार कमिटी व तपीयाना नामदेव गुरुद्वारा कमिटीने यात्रेचे स्वागत केले. दरम्यान आज २ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे घुमान ला भेट देत आहेत. त्यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *