नांदेडमध्ये २१ वर्षीय तरुणाचा खून: पावडेवाडी गावात मध्यरात्री तलवारीने हल्ला

नांदेड, २ नोव्हेंबर शनिवारच्या मध्यरात्री सुमारास १.३० वाजता, नांदेड जिल्ह्यातील पावडेवाडी गावात २१ वर्षीय तरुण रतीश पावडे याचा काही व्यक्तींनी निर्घृण खून केला. रतीशच्या शरीरावर १२ ते १३ तीक्ष्ण वारांचे जखम आढळून आले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रतीश पावडे हा पावडेवाडी गावचा रहिवासी होता. काल रात्री तो सुमारास एकच्या सुमारास आपल्या घरी परतला. त्याच्यासोबत आणखी दोन मित्र होते. त्याचे घर ऑक्सफर्ड स्कूलपासून अवघे ५० मीटर अंतरावर आहे. त्याच्या मागोमाग आलेल्या काही व्यक्तींनी त्याच्यावर समोरून आणि मागून तलवारी व चाकूने हल्ला केला, ज्यात त्याच्या शरीरावर १२ ते १३ वार झाले. गंभीर जखमी झाल्याने तो जागीच कोसळला आणि मृत्यू झाला.
गावातील सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी रतीश पावडे याची गावातील दिगंबर उर्फ दीपु पावडे याच्याशी वाद झाला होता. त्या वेळी रतीशने दीपुची मारहाण केली होती. पोलिसांचा अंदाज आहे की या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार जणांनी मिळून हा खून केला असावा.
घटनेनंतर भाग्यनगर पोलिस तांत्रिक मदतीच्या आधारे सर्व संशयितांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पावडेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



