अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा – २६ मोबाईल, ३ फोरव्हिलर, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त


नायगाव | प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मुखेड तालुक्यातील मौ रातोळी शिवारात पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धडक छापा टाकून तब्बल १६ लाख ६२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत २९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौ रातोळी शिवारातील विजय चंदरराव पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती ‘अंदर-बाहर’ नावाचा अवैध जुगार खेळत आहेत.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत मध्यरात्री सुमारे ३.४५ वाजता छापा टाकला.

छाप्यात आरोपींकडून रु. २,६८,४५०/- नगदी, ३ फोरव्हिलर, १ मोटारसायकल, २६ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १६,६२,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची नावे गजानन चंद्रकांत मोरे, आकाश व्यंकटराव दरेगावे, शिवाजी बाबुराव पाटील, चंद्रकांत विश्वंभर पाटोदे, व्यंकट गंगाराम देवकर, व्यंकटी पांडुरंग शिंदे, मनोहर शेषेराव जाधव, सायलु रामलु नागशेटवार, धर्मेंद्र गंगाधर दारमवार, धम्मपाल यादवराव कांबळे, गणेश राजू बच्चेवाड, सिध्देश्वर माधवराव घोणसे, आशितोष सुर्यकांत पत्तेवार, शेख सिध्दीकी शेख मैनोदीन, देवीदास प्रभु गोरलावाड, सुरेश किशनराव चोंडेकर, संगमेश्वर ऊर्फ बजरंग राजेश्वर कल्याणी, प्रताप दशरथ रघुवंशी, महेश नागनाथ नागमवार, योगेश रामदास राऊलवार, अदित्य अशोकराव देवडे, बालाजी मल्हारी कोणकेवाड, समीर खय्युम शेख, गंगाधर अमृत घायाळे, गजानन श्रीनिवास इंदुरकर, गंगाराम शिवन्ना कांदमवार, राजू उत्तम पवळे, अमजद ताहेरखान पठाण आणि इरवंत लच्छमन्ना अशी आरोपींची नावे आहेत.



