सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत फटाके फोडणाऱ्या तरुणांवर पोलिसांची कारवाई


नांदेड : मोटारसायकलचे सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत फटाके फोडणाऱ्या तरुणांवर नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने कारवाई केली आहे.
या कारवाईत दोन रॉयल एनफिल्ड बुलेट आणि एक बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली असून **दोन युवक आणि दोन विधी संघर्ष बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आकाश रमेश शितळे (वय २०, रा. विजयनगर, सिडको, नांदेड)
अमीत रमेश अभंग (वय २२, रा. संभाजी चौक, सिडको, नांदेड), दोन विधीसंघर्ष बालक (नावे गोपनीय)
जप्त मुद्देमाल रॉयल एनफिल्ड बुलेट (क्र. MH 26 BG 6174), रॉयल एनफिल्ड बुलेट (क्र. MH 26 CF 5509), बजाज पल्सर (क्र. MH 02 DY 3584), तसेच एक नंबर नसलेली मोटारसायकल
‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सायलेंसर काढून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.उप.नि. ज्ञानेश्वर मटवाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथक दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता पेट्रोलिंगदरम्यान कुसुमताई शाळेजवळ सापळा रचला.
सदर ठिकाणी आरोपी आकाश शितळे, अमीत अभंग आणि दोन विधीसंघर्ष बालक हे
त्यांच्या मोटारसायकलींचे सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत फटाके फोडत,
निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सर्वांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
सदर वाहनांवर पुढील कार्यवाहीसाठी **प्रादेशिक परिवहन विभाग, नांदेड यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
पोलीसांचा इशारा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, “कोणतीही व्यक्ती सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत वाहन चालवताना आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”



