दरोड्याच्या तयारीत असलेले पाच गुन्हेगार वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात; ३०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


नांदेड (प्रतिनिधी): वजिराबाद पोलीस स्टेशन आणि स्ट्रीट सेफ्टी पथकाने संयुक्त कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ३०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी फरार झाला आहे.
आरोपींची नावे आणि पत्ते: अदित्य शिवाजी जाधव, वय १९ वर्षे, रा. साठे चौक, शिवाजीनगर, नांदेड, राजेश रमेश सुर्यवंशी, वय २० वर्षे, रा. शिवनगर, नांदेड, सुरज बालसिंग पवळे, वय १९ वर्षे, रा. शिवनगर, नांदेड, क्रिपालसिंग शेरसिंग टाक, वय २३ वर्षे, रा. रमामाता नगर, आंबेडकर नगर, नांदेड, एक आरोपी फरार आहे.
जप्त मुद्देमाल: एक लोखंडी खंजर – किं. अं. ५००/-
2. गुलाबी रंगाच्या कॅरीबॅगमध्ये मिरची पावडर – किं. अं. ००/-
3. पांढऱ्या रंगाची दोरी (लांबी अंदाजे ५ ते सव्वा ५ फूट) – किं. अं. ००/-
4. बजाज पल्सर 220 मोटारसायकल (क्र. MH-26 CW-7946) – किं. अं. २०,०००/-
5. जुपिटर स्कूटी (क्र. MH-26 CJ-5402) – किं. अं. १०,०००/-

अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी शहरातील चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी व दरोड्यांसारखे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
या आदेशानुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी सपोनि प्रशांत दत्तात्रय लोंढे हे वजिराबाद पोलीस स्टेशनच्या ड्युटीवर असताना, रात्री १.३० वाजता गुप्त माहिती मिळाली की, नांदेड रेल्वे स्टेशनजवळील जुन्या सिटी बसस्थानकाजवळील पडक्या जागेत काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.
फिर्यादी आणि पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहून आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यापैकी चार जणांना झडप घालून पकडण्यात आले, तर एक जण फरार झाला. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या ताब्यातून दरोड्याचे साहित्य मिळाले.
सदर आरोपी हे यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शासकीय कामात अडथळा, भारतीय हत्यार कायदा आणि चोरी या स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.



