शहर

गुरुद्वारा गेट नंबर 1 चौक ते भगतसिंग चौक वाहतुकीसाठी प्रतिबंध

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : नांदेड शहरात गुरुद्वारा गेट नंबर 1 ते भगतसिंग चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत देनाबॅक चौक ते जुनामोंढा चौक हा मार्ग दुहेरी मार्ग म्हणून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी घोषीत केला आहे. देनाबॅक चौक ते जुनामोंढा चौक या पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यास त्यांनी मान्यता दिली आहे.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

तर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ता वाहतुक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी. अशी अधिसुचना जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार 7 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमीत केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *