जिला

नानक साई फाऊंडेशन चे संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार जाहीर

नांदेड : ९ नोव्हेंबर २९२५ पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जागृत करण्यात यशस्वी ठरलेल्या नांदेड येथील नानक -साई फाउंडेशन च्या वतीने दिले जाणारे २९२५ चे संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

नानक साई फाऊंडेशन ही संस्था सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असून फाऊंडेशन तर्फे दर दोन वर्षांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचां संत नामदेव महाराज यांच्या नावाने ‘जीवन गौरव पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्यात येतो. २०२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारात माजी महापौर मंगलाताई निमकर,नवज्योत फाऊंडेशन चे संस्थापक सरदार नवनीहालसिंघ जहागीरदार,

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री सरदार महेंद्रसिंघ पैदल, एस एस बावजिर,संजय कदम रुईकर,प्रा कृष्णराव भिसे पाटील,गोविंद शेषराव हंबर्ड, सरदार जसपालसिंघ नागरा , एडवोकेट चिरंजीवीलाल दागडीया ,प्रा. महेंद्र देशमुख,रामराव मीजगर,पुंडलिकराव बेलकर यांचा समवेश आहे. नानक साई फाऊंडेशन च्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेला ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त चैतन्यनगर शिवमंदिर नांदेड येथे आज ११ नोव्हेंबर रोजी सायं ४ वाजता धन्यवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, उपाध्यक्ष माधवराव पटणे, सतीश देशमुख तरोडेकर,सुभाष बल्लेवार, जी नागय्या,तुलसीदास भुसेवार, राणा रणबीरसिंघ पंजाब हॉटेलवाले,हरिदास भट्टड, मनोहर सेठ मंजुवाले, प्रल्हाद भालेराव,विनायक पाथरकर, प्रफुल्ला बोकारे,श्रेयसकुमार बोकारे,गंगाधर पांचाळ, धनंजय उमरीकर, अयुब पठाण, जयप्रकाश नागला यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *