जिला

लेबर किट घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी – वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

नांदेड (प्रतिनिधी):वंचित बहुजन आघाडीने आज जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनातून “लेबर किट घोटाळा” उघडकीस आणला आहे. आघाडीचा आरोप आहे की शासकीय वस्तू सेवाभावी संस्थांच्या नावाखाली मतदारांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आघाडीने स्पष्ट केले की शासकीय वस्तूंचा वापर निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी करणे हे “Representation of People Act, 1951” च्या कलम 123(1) तसेच IPC 171B अंतर्गत भ्रष्ट आचरण (corrupt practice) आणि लाच देण्याचा गुन्हा (bribery) ठरतो.

वंचित आघाडीने आपल्या मागण्यांमध्ये नमूद केले आहे की
1️⃣ लेबर कमिशनरसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.
2️⃣ या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती गठित करण्यात यावी.
3️⃣ निवडणूक प्रक्रियेच्या काळात कोणत्याही प्रकारच्या शासकीय साहित्य वितरणावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, जिल्हा महासचिव शाम कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कानूनी सल्लागार अॅड. शेख बिलाल, महासचिव महमद कासिम, शुक्लोधन गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नेत्यांनी इशारा दिला की “जर निष्पक्ष कारवाई करण्यात आली नाही, तर वंचित बहुजन आघाडी लेबर कमिशनरचे घेराव आंदोलन करणार!”

वंचित आघाडीने पुढे सांगितले की, लोकशाहीवर होणारा हा हल्ला सहन केला जाणार नाही. नांदेडची जनता पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक इच्छिते. घोटाळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हीच वंचित बहुजन आघाडीची ठाम मागणी आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *