वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई – अवैध गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

नांदेड. (13 नोव्हेंबर): वजिराबाद पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास अटक करून २५,५०० रुपये किंमतीचा गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटकेतील आरोपी:शेख अतिक पि. शेख शफी (वय 27), व्यवसाय बेकार, रा. दर्गा रोड, कुरबन आली शाह नगर, परभणी. पोलीस अधीक्षक मा. श्री अविनाश कुमार यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना गुप्त माहिती मिळाली की नांदेड सिटी बसस्थानक परिसरात एक इसम गावठी पिस्तूल विक्रीसाठी आला आहे.
यावर तात्काळ कारवाई करत पथकाने रात्री ११ वाजता छापा मारला. संशयितास अडवल्यानंतर पंचासमक्ष अंगझडती घेतली असता कमरेला गावठी पिस्तूल व शर्टात जिवंत काडतूस आढळून आले. सदर आरोपीला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



