राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत (महाराष्ट्र) नांदेड खेळाडू गुलशन याने रजत पदक पटकावून यश संपादीत

नांदेड. आग्रा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नांदेडच्या खेळाडू गुलशन रजा मोहम्मद वाईजून हक याने रजत पदक पटकावून विजय संपादीत केले. मागील आठवडयात आग्रा येथे झालेल्या आसाम विरुध्द महाराष्ट्र या सामन्यात महाराष्ट्र संघाने रजत पदक मिळवून यश संपादन केले आहे. या यशस्वी खेळाडूंचा श्री.राजू दाभाडे-रोल बॉल खेळाचे विश्व जनक व रोल बॉल फेडरेशनचे सचिव श्री प्रताप पगारे यांच्या हस्ते पदक देवून सत्कार व सन्मान करण्यात आले.
तसेच आसाम संघाला 14 वर्षाखालील खेळाडूने मात देवून महाराष्ट्र संघाने रजत पदक पटकाविले आहे. या यशस्वी खेळाडूंचे स्केटींग प्रशिक्षक अलीम खान व इम्रान खान यांचे खेळाडूनां मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेडचे श्री. जयकुमार टेंभरे, उपायुक्त-मनपा व क्रीडा अधिकारी-श्री. रमेश चावरे, रोल बॉल अध्यक्ष श्री. विजयकुमार पाटणी, संघटना अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, साजीद विंधानी, मोहम्मद जुबैर, विश्वास बालाजी कदम, सचिव अलीम खान, इमरान खान, शेख फारुक यांनी विजयी झाालेल्या खेळाडूस पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.



