जिला

मुदखेड तालुक्यात वाळू माफियांचा पुन्हा हैदोस

मुदखेड ता प्र अब्दुल हकीम / असून येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज मुदखेड च्या ४० विद्यार्थ्यांना शाळेकडे घेऊन जात असताना विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या शालेय बसला टिप्परने जोरदार धडक दिली सुदैवाने या धडकेत कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नसून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुदखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज मुदखेडच्या ४० विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बारड रस्त्यावर असलेल्या बसवेश्वर चौकात विद्यार्थ्यांना बसमध्ये (एम एच २० डिडि १०५ ) घेण्यासाठी शालेय बस थांबली होती सकाळी ८ वाजता बारडकडून येत असणाऱ्या रिकाम्या वाळूच्या टिप्परने निष्काळजीपणे टिप्पर चालवत भरधाव वेगात शाळेच्या बसला धडकली एकच हल्लकल्लोळ माजला बसमध्ये सर्व लहान मुले मुली होत्या टिप्पर घटनास्थळावरून पळून जात असताना त्यास नागरिकांनी

थांबविले घटनास्थळी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण पोलीस कर्मचारी बलबिरसिंह ठाकूर,शिनगारपुतळे आदींनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून दिले त्यानंतर सदर टिप्पर (एम एच २६ एडी ११६८) पोलीस ठाण्यात वळविण्यात आले बस चालक पंडित राठोड याच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे चालक पंडित राठोड याच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसला टिप्परने निष्काळजीपणे चालवत जोरदार धडक दिली दैव बलवत्तर म्हणून कसल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही अशा मुजोर वाळू माफियांच्या अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे पालकांतून व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *