उस्माननगर व स्था. गु. शाखेची संयुक्त कारवाई : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड : “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईमध्ये उस्माननगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांच्या संयुक्त पथकाने मोठी कार्रवाई केली. गोदावरी नदीपात्रातून परवानगीशिवाय वाळू उपसा करणाऱ्या इसमांवर छापा टाकून तब्बल 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी: संदीप रामदास येडे (रा. मारतळा, ता. लोहा), कैलास गोविंदराव ढगे (रा. मारतळा, ता. लोहा), नवनाथ भरकडे (रा. नंदगाव, ता. लोहा), ज्ञानेश्वर जाधव (रा. चिंचोली, ता. लोहा)
जप्त मुद्देमाल: मोठ्या लोखंडी/फायबर बोटी – 3 (किंमत सुमारे 45,00,000)
लहान इंजिन बोटी – 3 (किंमत सुमारे 30,00,000)
एकूण जप्ती : 75,00,000
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिलेल्या सूचनांनुसार अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रतिबंधक कारवाईसाठी सर्व पोलीस स्टेशनना आदेश जारी केले होते. त्यानुसार सपोनि संजय निलपत्रेवार (उस्माननगर) व सपोनि आरसेवार (स्थानीक गुन्हे शाखा) यांचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना गुप्त माहितीद्वारे मौजे कौडगाव व मौजे कामळज (ता. लोहा) परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची credible माहिती मिळाली

दोन स्वतंत्र पथकांनी छापा मारला असता, नदीपात्रात मोठ्या व लहान बोटी आढळून आल्या, मात्र बोटींवर काम करणारे इसम पोलीसांना पाहून पसार झाले. मंडळ अधिकारी श्रीमती पवार यांनी तपासणीदरम्यान बोटी वाळू उपशासाठी अवैधरित्या वापरल्या जात असल्याची खात्री दिल्यानंतर पंचनाम्यासह बोटी जप्त करण्यात आल्या. महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही बोटी जागेवरच नष्टही करण्यात आल्या.
सदर बोट मालकांची माहिती मिळवून त्यांच्या विरोधात उस्माननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



