मोटारसायकल चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद – 2 लाख 5 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची धडाकेबाज कारवाई


नांदेड – जिल्ह्यात वाढत चाललेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एक मोठे यश मिळाले असून, सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन एकूण 2,05,000 रुपयांच्या 7 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जेरबंद आरोपीचे नाव – विशाल देविदास जाधव (वय 32 वर्षे), व्यवसाय – वेकार, रा. चिकाळा तांडा, ता. मुदखेड, जि. नांदेड.
जप्त मुद्देमाल वेगवेगळ्या कंपनींच्या 07 मोटारसायकली
एकूण किंमत – 2,05,000/-
घटनेचा थोडक्यात आढावा नांदेड जिल्ह्यातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गतीमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोनि उदय खंडेराय यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून कामगिरी गतिमान करण्याचे आदेश दिले.

दिनांक 19/11/2025 रोजी पोउपनि नागनाथ तुकडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन हिंगोली गेटजवळील फटाका ग्राउंड परिसरात थांबला आहे. प्राप्त माहितीनुसार तात्काळ कारवाई करत नमूद इसम ताब्यात घेण्यात आला.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील 7 विविध कंपनींच्या मोटारसायकली मिळून आल्या. तपासात आरोपीने या सर्व मोटारसायकली नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद, उमरी, नांदेड ग्रामीण, बारड, मुदखेड, भोकर आदी ठिकाणांहून चोरी केल्याची कबुली दिली.
जप्त वाहनांची नोंद तपासली असता या सर्व पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले. ताब्यात घेतलेला आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन वजीराबाद यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.



