मोठी अपडेट! eKYC झालं गेमचेंजर; अनेक लाभार्थी महिलांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार


मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आला असून ई-केवायसी अनिवार्य** करण्यात आले आहे. नव्या नियमामुळे अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचे अर्ज आता थेट बाद होणार आहेत.
ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची सर्व आर्थिक आणि वैयक्तिक माहिती स्पष्ट होत आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे 1500 रुपयांचे मासिक लाभ कायमचे थांबणार आहेत. शासनाने स्पष्ट केले आहे की ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्यांचे लाभ देखील आपोआप रद्द होतील.
योजनेअंतर्गत पात्रतेचे नियम कठोर करण्यात आले असून,
* जे अर्जदार ई-केवायसी करणार नाहीत, त्यांना लाभ मिळणार नाही
* वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ तत्काळ बंद होणार
* ई-केवायसीदरम्यान ही माहिती स्वयंचलितपणे उघड होणार
नवीन नियमांमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने मात्र स्पष्ट केले आहे की फक्त खऱ्या पात्रांना योजनेचा फायदा मिळण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे.



