काँग्रेस सोबत जनता विजय अटळ -खा . रवींद्र चव्हाण ,प्रचाराचा नारळ कार्यालयाचे उद्घाटन


मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / सर्वसामान्य जनता काँग्रेस सोबत असल्याने नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणारच असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत विकासाच्या भखास पॅटर्नला बगल देण्यासाठी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शीलाताई राजबहादुर कोतावार यांच्या सह सर्वच काँग्रेेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन लोकसभा खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे .
नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा नारळ दि 22 (शनिवार) कालेजी मंदिरात देवीची आराधना करून सामूहिक आरती पूजा करण्यात आली . यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आली . यावेळी चप्पा चप्पा राजप्पा या घोषणेने परिसर दम दमून गेला होता . मोंढा बाजारपेठेतील काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा .रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोतवार, यूवक काँग्रेेस शहराध्यक्ष मुजीब पठाण, यूूवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल, प्रभारी शहराध्यक्ष सूर्यकांत चौदंते, इलियास अब्बासी, हाजी अब्दूल रशीद मूूलतानी, रईस मुलतानी,अविनाश मामीडवार, गोविंद गोपनपल्ले , गिरीश कोतावार यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेस पक्ष सर्व जातीधर्माला घेऊन चालणारा पक्ष असुन शहरात सर्व जाती-धर्मातील लोक वास्तव्यात असल्याने काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेले असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे यावेळी गजानन संबोड,मुजीब पठाण, विधान शेवटे, शिवानंद देवके, संजय बोकेफोड, आकाश सोनटक्के, मुलतानी, फजल शेख , यांच्यासह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यकांत चौदंते यांनी केले तर आभार गिरीश कोतावार यांनी मांनले



