क्राईम

घरफोड्या करणारी अंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एकूण 85,410 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 

नांदेड: जिल्ह्यातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने एका अंतरजिल्हा घरफोड्या टोळीला अटक करत त्यांच्या ताब्यातून 85,410 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

अटक केलेले आरोपी १) ईरन्ना गंगाधर नक्कलवाड वय 28 वर्षे व्यवसाय भंगार वेचणे, रा. नंदी नगर, मुदखेड, २) मारोती प्रकाश जिंकलवाड वय 30 वर्षे व्यवसाय भंगार वेचणे, रा. नंदी नगर, मुदखेड, 3) अशोक शिवराम वाघमारे वय 27 वर्षे, व्यवसाय भंगार वेचणे, रा. नंदी नगर, मुदखेड, 4) शंकर मस्सु जिंकलवाड वय 28 वर्षे, व्यवसाय भंगार वेचणे, रा. नंदी नगर, मुदखेड, तसेच एक विधीसंघर्षित बालक.

दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुवड व त्यांचे पथक हद्दीत पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही संशयित इसम शंकरराव चव्हाण चौक–माळटेकडी रेल्वे स्टेशन ओव्हरब्रिजखाली सोन्या–चांदीचे दागिने विक्रीसाठी थांबले आहेत.

यावरून पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

सोन्याचे दागिने : 5 तोळे – किमत 70,410 रुपये रोख रक्कम : 15,000 रुपये
एकूण जप्त मुद्देमाल : 85,410 रुपये

तपासदरम्यान आरोपींनी कबुली दिली की ते सर्वजण भंगार वेचण्याच्या नावाखाली नांदेड शहर व परिसरातील बंद घरे शोधून कडी–कोंडा तोडून घरफोड्या करीत असत. त्यांनी हदगाव, मुदखेड आणि नांदेडच्या परिसरात अनेक घरफोड्यांचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

अटक केलेल्या आरोपींसह जप्त मुद्देमाल पोस्टे शिवाजीनगर, हदगाव व मुदखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *