नांदेड जिल्ह्यात ‘ऑपरेशन फ्लश आउट’अंतर्गत मोठी कारवाई
अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर मास रेड; 2,61,920 मुद्देमाल जप्त


नांदेड | 29 नोव्हेंबर 2025 नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू व हातभट्टी दारू निर्मिती-विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवून धडक कारवाई केली. ‘ऑपरेशन फ्लश आउट’अंतर्गत आयोजित केलेल्या मास रेड मध्ये जिल्हाभरात 55 गुन्हे दाखल करण्यात आले असून 56 आरोपींवर कारवाई करून एकूण ₹2,61,920 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध दारूचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी 29 नोव्हेंबर रोजी विशेष मास रेडचे आदेश दिले होते.
जिल्हाभरात संयुक्त धडक मोहीम – मास रेडदरम्यान पोलिसांनी अवैध दारू तयार करणारे, हातभट्टी चालवणारे तसेच विक्री करणाऱ्यांच्या ठिकाणी छापे टाकले. अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने चालविलेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणात दारू, साहित्य, उपकरणे व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
55 दाखल गुन्हे, 56 आरोपींवर कारवाई, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹2,61,920
पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर सतत आणि कठोर कारवाई सुरूच राहील.



