क्राईम

वजिराबाद पोलिसांची कारवाई – नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल/लॉजवर धडक तपासणी

नांदेड | दिनांक 29 नोव्हेंबर 2025 नांदेड शहरातील हॉटेल व लॉजमध्ये सुरू असलेल्या नियमबाह्य कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी वजिराबाद पोलिसांनी धडक मोहीम राबवून अमृत लॉजसह तीन ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी – गोपाळ आनंदराव वाघ (वय 32), मॅनेजर, रा. नाळेश्वर, ता. नांदेड, पुरभाजी उत्तमराव हारकरे (वय 43), मालक, अमृत हॉटेल, रा. चौफाळा इतवारा, नांदेड

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हॉटेल, लॉज आणि स्पा सेंटरवर नियमित तपासणी मोहिमा राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. अवैध व्यवसाय किंवा नोंदणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

तपासणीची कारवाई 29 नोव्हेंबर रोजी वजिराबाद पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बसस्थानक ब्रिजजवळील अमृत लॉज तसेच स्वागत आणि सरराईज लॉज येथे अचानक छापा टाकण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत लोंढे, पो.कॉ. ज्वालासिंग बावरी व सचिन वालेकर यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

तपासणीदरम्यान- पैसेंजर रजिस्टरमध्ये खोली घेणाऱ्या व्यक्तींची पूर्ण नाव, पत्ता आणि सहप्रवाशांची माहिती अपूर्ण असल्याचे आढळले. काही व्यक्तींकडे ओळखपत्र किंवा आधार कार्ड उपलब्ध नव्हते. ही बाब नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याने मॅनेजर व मालकाकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा इशारा – नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, नांदेड शहरातील सर्व हॉटेल, लॉज आणि स्पा सेंटरमध्ये नियमित तपासणी सुरू राहणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

हॉटेल/लॉज चालकांसाठी सूचना- वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती रजिस्टरमध्ये नोंदवणे बंधनकारक ओळखपत्र तपासून ठेवणे कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवणे

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पुढील काळातही अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *