सक्षम हत्याकांड : चार आरोपींची पोलीस कोठडी पुन्हा दोन दिवसांनी वाढवली

नांदेड (प्रतिनिधी) परंतु आँचलच्या विधानानुसार, “सक्षम जयभीमवाला आहे” या कारणावरून तिचे वडील, दोन भाऊ आणि त्यांच्या मित्रांनी मिळून सक्षमची हत्या केली, असा दावा केला जात आहे.
27 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडात आतापर्यंत सात जणांना अटक झाली असून त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. सक्षमची आईसह सर्व आरोपींना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर आणि त्यानंतर 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर अशी पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र 1 डिसेंबर रोजी न्यायालयाने आँचलच्या आईची पोलीस कोठडी वाढविण्यास नकार दिला होता.
आज पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार सरबजितसिंह पुसरी, पुजलवाड, रहेमान आणि बालाजी लामतुरे यांनी आरोपी गजानन बालाजी मामीलवाड, साहिल मदनसिंह ठाकूर उर्फ मामीलवाड, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुदळेकर यांना न्यायालयात हजर केले.
सरकारी वकील ऍड. एम. ए. बत्तुल्ला (डांगे) यांनी तपासात अधिक प्रगती करण्यासाठी पोलीस कोठडी वाढविण्याची विनंती केली. पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. शिंदे यांनी ही मागणी मान्य करत चारही आरोपींची पोलीस कोठडी 6 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली.
दरम्यान, या प्रकरणातील सातवा आरोपी आमन देविदास शिरसे हा आधीच 6 डिसेंबरपर्यंतच्या पोलीस कोठडीत आहे.या घटनेनंतर अनेक विचारवंतांचे मत असे व्यक्त केले जात आहे की, आँचल आणि सक्षम यांच्यासारखी कित्येक जोडपी सुखाने संसार करू शकली असती, जर समाज ‘माणुसकी’ हीच खरी जात आहे हे मान्य करायला तयार झाला असता.



