जिला

लिंबगाव पोलिसांची कारवाई : अवैध रेतीउपसा करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – लिंबगाव पोलीस स्टेशन आणि महसूल पथकाने संयुक्त कारवाई करत गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींची नावे
1. बालाजी दिलीपराव हंबर्डे (35)
2. काळबा किशनराव दरेगावकर (35)
3. गुणाजी विश्वभर हंबर्डे (27)
4. गजानन किशनराव हंबर्डे (30)
5. सोनू माधवराव हंबर्डे (22) — सर्व रा. विष्णुपुरी, ता. जि. नांदेड
6. विजय संभाजी देशमुख (32) — रा. विष्णुपुरी
7. सचिन दिगंबर क्षीरसागर (31) — रा. कल्लाळ, ता. जि. नांदेड

जप्त केलेला मुद्देमाल*
पाच रेती उपसा करणारी इंजिने
दोन सेक्शन
एक फायबर बोट
दहा तराफे
एकूण किंमत : 47,00,000

पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत गौण खनिजांची अवैध वाहतूक व उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकार्‍यांना दिले होते.

या आदेशाच्या अनुषंगाने 3 डिसेंबर 2025 रोजी लिंबगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार आणि महसूल पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे बोरगाव तेलंग (ता. जि. नांदेड) येथील गोदावरी नदीपात्रात अचानक छापा टाकण्यात आला.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीउपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. छाप्यात दोन सेक्शन, एक फायबर बोट, पाच इंजिने आणि दहा तराफे मिळून आले. यापैकी दोन सेक्शन, फायबर बोट आणि दहा तराफे यांना जागेवरच नष्ट करण्यात आले. तर पाच रेती उपसा करणारी इंजिने पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. या प्रकरणात वरील सात आरोपींविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *