अवैध जुगार अड्ड्यावर छापा; 12 जणांवर कारवाई, 2,34,300 चा मुद्देमाल जप्त

नांदेड: जिल्ह्यातील बिलोली परिसरातील मौजे कार्ला येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत १२ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल आणि जुगार साहित्य असा एकूण 2,34,300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईतील आरोपींची नावे
1. रमेश सायलू जुटू (40),
2. राजेन्ना बुद्धेवार (45),
3. संदीप नांगेद्र मलेपुला (33),
4. गंगाराम वर्णी (58),
5. राजेश्वर बुमगोंडा गौरला (37),
6. संतोष रामलू मलेपुला (45),
7. गौरजी वडैप्पा मुसके (42), सर्व रा. सालुरा, ता. बोधन, जि. निजामाबाद
8. नागनाथ थोडिंबा जामनूर (38), रा. कार्ला, ता. बिलोली
9. रमेश राजाराम मलशेटवाड, रा. सगरोळी, ता. बिलोली
10. संतोष दत्ताराव सोनपूरे, रा. सगरोळी, ता. बिलोली
11. सदाम पिंजारी, रा. कार्ला, ता. बिलोली
12. माधव, रा. कार्ला, ता. बिलोली

जप्त मुद्देमाल
नगदी: 87,000 दहा मोबाईल फोन, एक मोटारसायकल, जुगार साहित्य एकूण किमत: 2,34,300
नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. याच अनुषंगाने 7 डिसेंबर 2025 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे कार्ला येथील राजू पाटील यांच्या शेताच्या पूर्वेस असलेल्या मांजरा नदीपात्रात काही जण ‘अंदर-बाहर’ जुगार खेळत आहेत.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तयार करण्यात आलेल्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी सर्व १२ आरोपी जुगार खेळत असताना रंगेहाथ मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल आणि जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन बिलोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




