क्राईम

कोम्बींग ऑपरेशनदरम्यान तीन आरोपींकडून अग्नीशस्त्र, जिवंत काडतुसे आणि दोन खंजीर जप्त

 

नांदेड : नांदेड शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरारी आरोपी, हद्दपार आरोपी तसेच अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या कोम्बींग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींकडून एक अग्नीशस्त्र, दोन जिवंत काडतुसे आणि दोन खंजीर जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींची नावे अनिल उर्फ भुऱ्या पि. सुधाकर गच्चे (23 वर्षे)व्यवसाय–बेकार, रा. आंबेडकरनगर, नांदेड, शुभम उर्फ शिवा पि. जालिंदर दवणे (24 वर्षे) व्यवसाय–बेकार, रा. तेहरा नगर, नांदेड, शुभम पंढरी गायकवाड (23 वर्षे) व्यवसाय–बेकार, रा. तेहरा नगर, नांदेड

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी शहर व जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरारी आरोपी, हद्दपार, अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी तसेच अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यात कोम्बींग ऑपरेशन सुरू करण्यात आले.

या ऑपरेशनदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने शिवाजीनगर हद्दीत कारवाई चालू असताना गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला.

या वेळी अनिल उर्फ भुऱ्या गच्चे याच्याकडून एक अग्नीशस्त्र व दोन जिवंत काडतुसे, तर शुभम उर्फ शिवा दवणे व शुभम गायकवाड या दोघांकडून दोन खंजीर पंचासमक्ष जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *