पोलीस स्टेशन उस्माननगर व महसूल विभागाची मोठी कारवाई

उस्माननगर पोलीस स्टेशन व महसुल पथकाने संयुक्त कारवाई करत एकूण ₹2,20,00,000/- (दोन कोटी वीस लाख रुपये) किमतीच्या अवैध रेती उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या सात मोठ्या लोखंडी फायबर बोट व तीन छोटे लोखंडी इंजिन बोटी जागीच नष्ट केल्या.
आरोपी / बोट मालक सात मोठ्या लोखंडी फायबर बोटीचे चालक–मालक
तीन छोटे लोखंडी इंजिन बोटीचे चालक–मालक (माहिती संकलन सुरू)
जप्त मुद्देमाल (एकूण किंमत : 2.20 कोटी)
सात मोठे लोखंडी फायबर बोट किंमत : 1,75,00,000/-
तीन छोटे लोखंडी इंजिन बोट किंमत : 45,00,000/-
नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनना अवैध रेती उत्खननाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
दिनांक 10/12/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता
सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली उस्माननगर व मुदखेड पोलीस पथक तसेच तहसीलदार परळीकर, सर्कल ऑफिसर व ग्राम महसूल अधिकारी यांनी येळी शिवारातील गोदावरी नदी परिसरात छापा टाकला.
छाप्यादरम्यान काही इसम परवानगीशिवाय मोठ्या फायबर बोटी व छोटे इंजिनबोटीच्या मदतीने गोदावरी नदीतून अवैध रेती (गौण खनिज) उपसा करताना दिसले. पोलीस पथक पाहताच ते इसम घटनास्थळावरून पळून गेले.
स्थळावर सात मोठ्या बोटी व तीन इंजिन बोटी मिळून आल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जिलेटीनच्या सहाय्याने सर्व बोटी जागीच नष्ट केल्या. पुढील कारवाई बोट मालक व चालकांची माहिती गोळा करून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.



