शहर

कौठा येथील मंगळवार बाजाराचे संयुक्त कारवाईत स्थलांतर

 

नांदेड, दि. 09 डिसेंबर 2025: कौठा मेन रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अडचणी लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मंगळवार बाजाराचे यशस्वीपणे स्थलांतर केले.

गत काही महिन्यांपासून परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि पादचारी यांच्याकडून वाहतूक नियोजन, पादचारी सुरक्षा, स्वच्छता आणि अतिक्रमणाबाबत सतत तक्रारी येत होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून महापालिकेने पर्यायी जागा निश्चित केली होती. त्या अनुषंगाने आज सकाळी बाजारातील सर्व दुकानदारांचे शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित पद्धतीने स्थलांतर करण्यात आले असून नवीन बाजार साई बाबा कमान मार्गे वसरणी रोडवर सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, पोउपनि ज्ञानेश्वर भोसले, पोहेकॉ गणेश वाघमारे, बालाजी दंत्तापल्ले, श्याम भोसले, शेख अनवर यांसह महापालिकेचे अधिकारी

अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उप आयुक्त अजीतपालसिंग संधू, सहाय्यक आयुक्त (सिडको झोन) मिर्झा फरतउल्ला बेग, सहाय्यक आयुक्त रावन सोनसळे, तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी फेरोजी दासरे व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

स्थलांतरण प्रक्रियेदरम्यान व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे कारवाई सुरळीत पार पडली. याबद्दल पोलीस व महापालिका प्रशासनाने सर्वांचे आभार मानले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *