एनसीपी अल्पसंख्यांक विभागात (अजित पवार गट) शेख असलम सिडको यांची नांदेड दक्षिण शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

नांदेड | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागात (अजित पवार गट) संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडको येथील रहिवासी शेख असलम यांची एनसीपी अल्पसंख्यांक विभाग, नांदेड दक्षिण शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शेख असलम यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची व संघटनात्मक सक्रियतेची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून, त्याचाच भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमीर पठाण मालीपटेल यांनी केली.

ही नियुक्ती आज खान्डार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात, वसंत नगर येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. जमीर पठाण मालीपटेल यांच्या हस्ते शेख असलम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना शेख असलम यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी ते गांभीर्याने प्रयत्न करतील. तसेच पक्ष अधिक मजबूत कसा करता येईल, यासाठी विशेष लक्ष देत जनतेला पक्षाशी जोडण्याचे व तळागाळात संघटना मजबूत करण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करतील.
आपल्या नियुक्तीबाबत बोलताना शेख असलम यांनी पक्षाच्या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासास पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.



