मराठवाडा

रेल्वेकडून पेन्शन अदालतीचे यशस्वी आयोजन

रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक 15.12.2025 रोजी रेल्वेकडून पेन्शन अदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेंद्रकुमार मीणा यांनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. यावेळी मुख्य वैद्यकीय अधीक्षक श्री. एम. के. श्रीनिवास, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अशोक कांबळे, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सौ. के. रसना देवी, विभागीय कार्मिक अधिकारी / समन्वय यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी पेन्शनधारकांच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निवारण करण्यासाठी पेन्शन अदालतीचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी पेन्शनविषयक बाबी, वैद्यकीय सुविधा तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या विविध लाभांविषयी पेन्शनधारकांना मार्गदर्शन केले. पेन्शनधारकांच्या तक्रारी वेळेत व पारदर्शक पद्धतीने सोडविण्यास रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

बँक प्रतिनिधींनी पेन्शन वितरण व बँकिंग सेवांबाबतच्या शंकांचे निरसन केले, तर विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी पेन्शनधारकांनी मांडलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. एम. सुरेश, सहायक कार्मिक अधिकारी /इंजिनिअरिंग यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी सर्व मान्यवर, अधिकारी, पेन्शनधारक व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पेन्शन अदालतीच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *