क्राईम

नांदेड जिल्ह्यात मोबाईल मिसिंग प्रकरणी मोठी कारवाई

सायबर शाखेची उल्लेखनीय कामगिरी; 30.49 लाखांचे 202 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत

 

नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे व बाजार परिसरातून गहाळ झालेल्या महागड्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी नांदेडचे मा. पोलीस अधीक्षक यांनी संबंधित यंत्रणांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलीस स्टेशन नांदेड, स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे संयुक्त पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन तपास करण्यात आला. त्यातून एकूण 202 गहाळ अँड्रॉइड मोबाईल फोन, अंदाजे 30 लाख 49 हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात सायबर शाखेला यश आले. शोध घेण्यात आलेले सर्व मोबाईल आज मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते एकत्रितपणे मूळ मालकांना वितरित करण्यात आले.

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकांची माहिती नांदेड पोलीस दलाच्या अधिकृत “Nanded Police” फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ. अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड), पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. आश्विनी जगताप तसेच पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सायबर पोलीस स्टेशनचे पो.उप.नि. एम. बी. चव्हाण यांच्यासह पोलीस अमलदार राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, महेश बडगु, मपोका कांचन कसबे, रेश्मा पठाण, शुभांगी जाधव, दावीद पिडगे, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दीपक राठोड, साई शेंडगे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

दरम्यान, मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नागरिकांना गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती CEIR पोर्टलवर तात्काळ अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *