जिला

शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड उपजिल्हाप्रमुखपदी जगिंदरसिंग नंबरदार यांची नियुक्ती; हेमंतभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 

नांदेड : शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड उपजिल्हाप्रमुखपदी जगिंदरसिंग छगनसिंग नंबरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र मा. नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख अनवर अहेमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार तसेच पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

उपनेते ना. हेमंतभाऊ पाटील व शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. सईद भैय्या खान यांच्या सूचनेनुसार, तसेच नांदेड जिल्ह्याचे मार्गदर्शक मा. आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव पाटील बोंढारकर व आ. बाबूराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी नंबरदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे नांदेड जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षवाढीसाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सक्रियपणे कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी जगिंदरसिंग नंबरदार यांचे अभिनंदन केले.

नियुक्तीबद्दल जिल्हाप्रमुख अनवर अहेमद, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी जगिंदरसिंग नंबरदार यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *