जिला

माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर; भव्य आरोग्य प्रदर्शनीचे उद्घाटन

 

 

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा – मिडिया सेंटर
मिलिंद व्यवहारे – ८६२६०२५८२५

क्षीक्षेत्र माळेगाव यात्रा, मीडिया सेंटर- दि. १९ डिसेंबर:-सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला यंदा मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य प्रदर्शनीचे उद्घाटन कंधार-लोहा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही आरोग्य प्रदर्शनी २५ डिसेंबर पर्यंत भाविकांसाठी खुली राहणार आहे.

शासकीय आरोग्य योजनांची माहिती व जनजागृती

या आरोग्य प्रदर्शनीमध्ये शासनाच्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स, बॅनर्स व पोस्टर्स उभारण्यात आले आहेत. तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवणे व जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत भाविकांना शासकीय योजनांचे लाभ, प्रतिबंधात्मक उपाय तसेच आरोग्य शिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन

या प्रदर्शनीत माहितीबरोबरच मोफत आरोग्य तपासणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्येसिकलसेल तपासणी, सीवाय-टीबी तपासणी, एचआयव्ही तपासणी, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जात आहेत. यासोबतच फ्लिपचार्ट, घडीपत्रिका व माहितीपत्रकांच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात येत आहे.

कलापथकाद्वारे प्रभावी जनजागृती

या आरोग्य प्रदर्शनीचे विशेष आकर्षण म्हणजे कलापथक. आरोग्य विषयांवर आधारित पथनाट्य व गीतांच्या माध्यमातून हजारो भाविकांमध्ये मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येत असून, या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रशासकीय नियोजन व मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमाचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची टीम प्रभावीपणे कार्यरत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही आरोग्य प्रदर्शनी राबविण्यात येत आहे. माळेगाव यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांनी या आरोग्य प्रदर्शनीचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *