मराठवाडा

परभणीत काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न; काँग्रेस भवनात शक्तीप्रदर्शन

महानगरपालिका निवडणुकीसाठी 100 पेक्षा अधिक इच्छुकांची मुलाखत, काँग्रेस भवनाला छावणीचे स्वरूप

 

 

परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या. या मुलाखतींसाठी काँग्रेस भवनात मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी करत शक्तीप्रदर्शन केले.

परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून आज काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत 100 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी आपली मुलाखत दिली. यामुळे काँग्रेस भवन परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.

या मुलाखतींच्या वेळी पक्षाचे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी आमदार, माजी खासदार तसेच काँग्रेस पक्षाचे आजी–माजी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. इच्छुक उमेदवारांकडून पक्ष संघटन, स्थानिक प्रश्न, विकास आराखडा आणि मतदारांशी असलेला संपर्क याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

दरम्यान, डॉ. फरीन जहाँ अन्सारी आणि गुड्डू भाई अन्सारी यांनी आज काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवार म्हणून आपली मुलाखत दिली. त्यांनी प्रभाग क्रमांक 8-अ आणि 14-अ मधून ओबीसी महिला उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारी अर्ज शेकडो समर्थकांसह दाखल केला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उमेदवारांनी सांगितले की, सर्व जाती-धर्मातील मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. प्रभागात शादीखाणे, आरोग्य केंद्र, घंटागाडी, रस्ते, नाली, वीज व पाणी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिले.

सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूणच काँग्रेस पक्षाकडून पार पडलेल्या या मुलाखतींमुळे परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *