जिला

माळेगाव यात्रेत भाविकांसाठी शुद्ध पाणीपुरवठा

 

श्रीक्षेत्र माळेगाव, दिनांक 20 डिसेंबर- माळेगाव यात्रेत भाविकांसाठी शुध्द, पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लिंबोटी जलाशयामध्ये बसविण्यात आलेल्या 120 एचपी क्षमतेच्या व्हर्टिकल टर्बाईन पंपाद्वारे तसेच लिंबोटी जलशुद्धीकरण केंद्रातील 100 एचपी क्षमतेच्या सेंट्रीफ्युगल पंपाद्वारे पाणी उचलण्यात येत आहे.

या पाण्यावर तुरटी, ब्लीचिंग पावडर, फिल्टर मिडिया यांचा वापर करून शुद्धीकरण केले जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नियमित ओटी टेस्ट घेऊन पाणी पिण्यास योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच यात्रेसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषद लातूरकडून 3 टँकर, सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोलीकडून 2 टँकर, गुरुद्वारा लंगर साहिबकडून 2 टँकर तसेच नांदेड महानगरपालिकेकडून 1 टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. दररोज सकाळी 5 वाजल्यापासून 8 टँकरद्वारे सर्व हॉटेल्स व व्यापाऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तसेच घोडा लाईन, उंट लाईन, गाढव लाईन, तमाशा मंडळ, आकाश पाळणे, मंदिर गल्ली, पोलीस कॅम्प आदी ठिकाणी नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन बसस्थानकांवर प्रत्येकी एक टँकर तैनात ठेवण्यात आला असून, एक टँकर अतिरिक्त राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या ठिकाणीही दिवसभर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *