जिला

माळेगाव यात्रेतील घडामोडी प्रभावीपणे मांडणारे जिल्हा परिषदेचे मीडिया सेंटर- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दि. 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील घडामोडी, विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती वेळेवर व अचूक स्वरूपात सर्व माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मीडिया सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या मीडिया सेंटरच्या माध्यमातून यात्रेतील दैनंदिन घडामोडी, बातम्या व छायाचित्रे विविध माध्यमांना नियमितपणे पाठवण्यात येत आहेत.

या मीडिया सेंटरला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने यात्रास्थळी मीडिया सेंटर उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम अत्यंत अभिनव व स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. माळेगाव यात्रेचे वैभव, परंपरा व भव्यता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे मीडिया सेंटर अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले. मीडिया सेंटरमधील अधिकारी व कर्मचारी अतिशय नियोजनबद्ध व प्रभावी पद्धतीने वृत्तांकन करून माध्यमांना माहिती पुरवत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मीडिया सेंटरमार्फत आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या बातम्यांचे संकलन व वृत्तकात्रणे पाहून समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे, मीडिया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्यवहारे, नंदलाल लोकडे, शिवाजी टोम्पे, दत्तात्रय इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, सूर्यकांत हिंगमिरे उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *