जिला

माळेगाव यात्रेत लावणी महोत्सव; बहारदार सादरीकरणांनी रसिक मंत्रमुग्ध

 

श्रीक्षेत्र माळेगाव, मीडिया सेंटर, दिनांक 22 डिसेंबर- माळेगाव यात्रेनिमित्त सोमवारी पार पडलेल्या लावणी महोत्सवात एकापेक्षा एक दिलकश, बहारदार आणि ठसकेबाज लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले. नटले तुमच्यासाठी दिलबरा राजसा विडा रंगला ओठी…, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारीत…, अशा सदाबहार लावण्यांनी रसिकांची मने जिंकली.

या लावणी महोत्सवात रूपा परभणीकर, अंबिका-अनुराधा लखनगावकर, स्नेहा-शामल लखनगावकर, मंगल-माया खामगावकर, आशा-वैशाली नगरकर, पूनम कुडाळकर प्रस्तुत तुमच्यासाठी काय पण, अमर पुणेकर निर्मित नटखट सुंदरा तसेच शाहीर मस्के व अनुराधा नांदेडकर अशा आठ नामवंत संचांनी आपली कला सादर केली.

डोईवर पाटी… मी आले तुम्हासाठी…, अहो यांना, आहो घ्या ना… आंबा कोल्हापुरी…, औंदा लगीन करायचं मी ठरवलं आहे बाई…, मला कोल्हापूर एक पैलवान पाहिजे…, रूप देखणं, रेखीव बांधा, कुंकू लावलं कपाळी…, राया थेंबानं केलंय मला गार… अशा बहारदार लावण्यांना रसिकांनी प्रचंड दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमात रसिकांनी ताल धरत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व कलावंतांचा जिल्हा परिषदेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

रसिकांच्या प्रेमामुळेच पारंपरिक लावणी आजही टिकून आहे, असे मत लावणी महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांनी यावेळी व्यक्त केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *