मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे अल्प भू धारक लखे परिवारातील चार जणांचा 24 च्या रात्री संशयास्पद मृत्यूमुळे
एकच खळबळ उडाली असून, आई, वडिलांचे मृतदेह घरी आढळले असून, दोन भावांनी रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत असून, त्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
25 डिसे रोजी सकाळी मुगट रेल्वेस्थानक परिसरात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. उमेश रमेश लखे
(२५), बजरंग रमेश लखे (22) अशी या दोघांची नावे असून,
या दोघांनी रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची शंका आहे. त्यांचे वडील रमेश होनाजी लखे ( 55 ) आणि आई राधाबाई रमेश लखे (48)यांचा मृतदेह त्यांच्याच घरात बाजेव आढळला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी पोहंचले. उमेश लखे हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सामाजिक कार्यात त्याचा मोठा सहभाग होता. मात्र हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची माहिती पोलीस घेत आहेत. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावातील हे रहिवाशी असून, त्यांच्या घरात चार जणांचे कुटुंब आहे.
आर्थिक , मानसिक विवंचनेतून किंवा कुठल्या कारणातून ही घटना घडली की घातपात आहे, याचा शोध बारड पोलीस घेत असून, संबधीत घटना स्थळी नांदेडचे पोलीस अधिक्षक अविनाश कुमार सह उप पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा सर्व बाजूने आढावा घेत आवश्यक त्यासुचना तपास पथकाला दिल्या आहेत रेलवे घटनास्थळावरून फॉरेन्सीक लॅब ची टिम घटनास्थळी आवश्यक शोध घेत आहे .



