जिला

काँग्रेसचे 10 माजी नगरसेवक एमआयएममध्ये; भाजप–अशोक चव्हाण रणनीतीची जोरदार चर्चा

 

नांदेड | विशेष प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हादरवून टाकणारा मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसच्या तब्बल दहा माजी नगरसेवकांनी अचानक एमआयएममध्ये प्रवेश केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय समीकरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीमागे भाजपचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांची सूक्ष्म पण प्रभावी रणनीती असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मुदखेड आणि भोकरमध्ये एमआयएमच्या माध्यमातून मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला, हे निकालातून स्पष्ट झाले होते. हाच प्रयोग आता थेट नांदेड वाघाळा महापालिकेत राबवला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस व मुस्लिम नेत्यांकडून केला जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी महापौर शमीम अब्दुल्ला आणि मसूद अहमद खान यांच्यासह हबीब बागवान, चांदपाशा कुरेशी, अब्दुल रशीद, अन्सार खान, अब्दुल हफिज आणि नासिर खान यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे आणखी दोन माजी नगरसेवक लवकरच एमआयएममध्ये जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

काँग्रेसची पारंपरिक मुस्लिम मतांची मजबूत वोटबँक फोडून भाजपसाठी सत्तेचा मार्ग मोकळा करण्याचा हा मोठा राजकीय डाव असल्याचे मुस्लिम नेते उघडपणे बोलू लागले आहेत. या घडामोडीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली असून, नांदेडचे राजकारण निर्णायक वळणावर आले आहे.

आगामी नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत हा प्रवेश काँग्रेससाठी धोक्याची घंटा तर भाजपसाठी गेमचेंजर ठरेल का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *