लोहा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार सोहळा

लोहा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी बोलताना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. तर माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रविण पाटील चिखलीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांतदादा शिंदे, नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. छायाचित्र – विनोद महाबळे



