गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी छापा कारवाई करत तब्बल ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत करण्यात आली आहे.
आरोपी रामचंद्र वानखेडे संदीप वानखेडे रा. मौ. गंगाबेट, ता. जि. नांदेड
(इतर एक आरोपी फरार)
जप्त मुद्देमाल ५ ब्रास रेती – किंमत ₹25,000/-
पाण्यात तरंगणारे ८ तराफे – किंमत ₹4,00,000/-
१ इंजिन – किंमत ₹3,00,000/-
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹7,25,000/-
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज (रेती) उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 3.30 वाजता, मौ. गंगाबेट येथील गोदावरी नदीपात्रात चोरीछुपे अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत एक इंजिन व आठ तराफे जागीच नष्ट करण्यात आले, तसेच नदीकिनारी साठवलेली ५ ब्रास रेती जप्त करण्यात आली.
गुन्हा दाखल आरोपींविरोधात भा.न्या.सं. कलम 303(2), 3(5)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8)
पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9, 15
सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 7
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



