जिला

UFBU कडून देशव्यापी आंदोलन नांदेडमध्ये SBI शिवाजी नगर मुख्य शाखेसमोर जोरदार निदर्शने

 

नांदेड | ३० डिसेंबर २०२५ युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या वतीने आज ३० डिसेंबर २०२५ रोजी देशभरात एकाचवेळी आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने नांदेड शहरातील SBI बँक, शिवाजी नगर मुख्य शाखेसमोर UFBU च्या पदाधिकारी व बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याला ५ दिवस बँकिंग प्रणाली तातडीने लागू करावी या प्रमुख आणि दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकार व बँक व्यवस्थापनाच्या धोरणांचा निषेध केला.

या आंदोलनात AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF, INBOC, NOBW आणि NOBO या सर्व प्रमुख बँक कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बँक कर्मचाऱ्यांवर वाढत चाललेला कामाचा ताण, दीर्घ कामाचे तास, सतत बदलणारी धोरणे आणि त्यामुळे बिघडत चाललेला काम–जीवन समतोल यामुळे ५ दिवसांचा आठवडा अत्यावश्यक असल्याचे UFBU कडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

UFBU च्या नेत्यांनी सांगितले की, इतर शासकीय व निमशासकीय विभागांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांनाही आठवड्याला ५ दिवस कामकाजाची सुविधा देण्यात यावी. अनेक देशांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे राबवली जात असून भारतातही ती तातडीने लागू करणे गरजेचे आहे.

दरम्यान, सरकार व बँक व्यवस्थापनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा UFBU कडून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे देशभरातील बँकिंग व्यवहार, चेक क्लिअरन्स, कर्ज प्रक्रिया व ग्राहक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *