स्पोर्ट्स

महात्मा कबीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड

नांदेड : महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर, नांदेड येथील कु. गीता गोपीनाथ कांबळे आणि साई बाळू गजभारे या खेळाडूंची शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक यांच्या वतीने दि. २५ ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर, नांदेड येथील १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मुलींमध्ये कु. गीता गोपीनाथ कांबळे आणि मुलांमध्ये साई बाळू गजभारे यांची दि. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रविणकुमार कुपटीकर, जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार ठेंबरे, शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. कोकलेगांवकर, प्रा. विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. जोशी, क्रीडा अधिकारी बेतीकर, कोंडेकर, बालाजी शिरसीकर, नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सहसचिव रविकुमार बकवाड तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी व शाळेतील सर्व स्टाफ यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

या खेळाडूंना प्रशिक्षक सुमेध गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *