ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना मरखेल पोलिसांनी पकडले; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यातील मरखेल पोलिसांनी रात्री गस्तीदरम्यान धाडसी कारवाई करत ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांपैकी एका आरोपीला पकडले असून त्याच्याकडून सुमारे 7,45,790 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव सेवकसिंग रघुसिंग तिलपते व इतर दोन साथीदार, सर्व रा. उमरी ता. उमरी जि. नांदेड
जप्त मुद्देमाल: चांदीचे दागिने – वजन 2 किलो 600 ग्रॅम, किंमत अंदाजे ₹7,00,000
रोख रक्कम – 30,790 एक ग्रॅम सोन्याचे 12 मणी – किंमत अंदाजे 15,000एकूण किंमत: 7,45,790
पोलीस अधीक्षक नांदेड अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रगस्त व क्यूआर कोड स्कॅनिंगचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दिनांक 30/01/2026 ते 31/01/2026 च्या रात्री पोलीस स्टेशन मरखेल हद्दीत पोउपनि विलास पवार, पोका 3196 रफिक सय्यद व चालक पोका 861 यादव सोनकांबळे गस्त घालत होते.
मौजे हाणेगाव येथील मुख्य सराफा बाजारात क्यूआर कोड स्कॅन करत असताना आच्यारे ज्वेलर्स दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले. दुकानासमोर एक इसम संशयित अवस्थेत रेकी करताना दिसून आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ वाहन दुकानासमोर नेले. त्यावेळी आरोपीच्या इशाऱ्यावरून दुकानातील दोन चोरटे सोन्या-चांदीचे दागिने पांढऱ्या पोत्यात भरून अंधाराचा फायदा घेत पळू लागले.
पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून सेवकसिंग रघुसिंग तिलपते याला ताब्यात घेतले. त्याला मदतीसाठी सपोनि रवी हुंडेकर व पोका 2864 नारायण यंगाले घटनास्थळी दाखल झाले. आरोपीच्या ताब्यातून वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसी चौकशीत आरोपीने इतर साथीदारांची नावे व संपूर्ण कटकारस्थान उघड केले आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके तयार करण्यात आली असून, इतर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोउपनि श्री. विलास पवार करीत आहेत.
न्यायालयाने अटक आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
.



