क्राईम

लातूरमध्ये मटका बुकीवर मोठी कारवाई – 15 जणांविरुद्ध गुन्हा, ₹1.41 लाख रोकड जप्त

 

लातूर | प्रतिनिधी लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरुद्ध पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत एक मोठे जाळे उघड केले आहे. या कारवाईत 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ₹1 लाख 41 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर शहरात सुरू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक पाठवले होते. या पथकाने दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी शाहू चौक ते गंजगोलाई रोडवरील गोजमगुंडे कॉम्प्लेक्स येथे छापा टाकला.

या कारवाईदरम्यान विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ₹1,41,000 रोकड, 3 मोबाईल फोन असा एकूण ₹1,75,100 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छाप्यात मिळालेल्या नोंदी व आरोपीच्या कबुलीनुसार, गोविंद चंद्रसेन खाडप (पाटील) रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर हा या मटका बुकीचा मुख्य मालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याने शहरातील विविध भागात एजंट नेमून त्यांच्या माध्यमातून मटका व्यवसाय चालविल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी बुकी चालक विजय लांडगे, बुकी मालक गोविंद खाडप व त्याच्या 13 एजंटांविरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गु.र. नं. 82/2026, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि सोनकांबळे करत आहेत.

या कारवाईत नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील सपोनि श्रीराम माचेवाड यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, नागरिकांना त्यांच्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती सहज देता यावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास, nandedrange.mahapolice.gov.in संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या हेल्पलाइनवर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *