शहर

लाल बावटा युनियनच्या आंदोलनाला यश; प्रशासनाचे लेखी आश्वासन

नांदेड (प्रतिनिधी) – महापालिकेच्या प्रशासनाने कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेणे, थकीत बोनस देणे व इतर प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठवाडा न.पा. व मनपा कामगार कर्मचारी युनियन (लाल बावटा) यांचे सुरू असलेले तीव्र आंदोलन अखेर यशस्वीरीत्या स्थगित करण्यात आले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून काही महिन्यांपूर्वी काही कंत्राटी कामगारांना बेकायदेशीरपणे सेवेतून कमी करण्यात आले होते. तसेच बोनस वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप करत युनियनतर्फे सातत्याने आंदोलन, निवेदने आणि पत्रव्यवहार सुरू होता. या सर्व प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने ३ फेब्रुवारीपासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात आले होते.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांच्या उपस्थितीत विविध विभागप्रमुख, प्रशासनाचे अधिकारी व कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त नितीन गाढवे, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्यासह कामगार नेते ॲड. कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. शांताबाई पवळे, कॉ. वंदना वाघमारे, कॉ. वैशाली धुळे, कॉ. शशिकला वाघमारे आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

चर्चा यशस्वी ठरल्यानंतर कॉ. प्रदीप नागापूरकर तसेच प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन आंदोलनाची अधिकृत सांगता करण्यात आली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *