जिला

किनवट तालुक्यात अस्वलाचा हल्ला; शेतकरी ठार, ८ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

 

किनवट(प्रतिनिधी)किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथ मंगळवारी (दि.10) मध्यरात्री चिडलेल्या अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड व संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळ परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले असून वन विभागान अस्वलाला पकडण्यासाठी विशेष पथकासह रेस्क्यू मोहीम सुरू केली आहे.

दत्ता बळीराम जाधव (वय ५५) हे मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या ओरडण्यान े मदतीला धावलेल्या इतर शेतकऱ्यांवरही अस्वलाने हल्ला चढवला. यात रमेश बळीराम जाधव (४५), शंकर तानाजी जाधव (५०), सुदर्शन दत्ता पवार (३५), चंद्रसिंग शेषराव राठोड (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अनुक्रमे पहिल्या तिघांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. तसेच पंडित जयसिंग जाधव (२२), विनोद शेषराव राठोड (३४), अरविंद शेषराव जाधव (३५) व संजय दत्ता जाधव (३०) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शिवणी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचार करण्यात आले.

गंभीर जखमी रमेश जाधव यांना जेसीबीच्या साहाय्यान बाहेर काढण्यात आले होते. पहाट घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलीस ठाण्याच सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, वन विकास महामंडळाच अधिकारी चोले, तसेच स्थानिक पदाधिकारी आण ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. भाजपाच माजी तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, प्रकाश जाधव, जेसीन मालक संजय तोटावाड, चालक मोसम भाई व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अस्वलाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले होते. वनविभागान त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली होती. मात्र, त्यानंतर योग्यप्रकारे जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही घटना टळली असती, अशी भावना ग्रामस्थांनी घटनास्थळी व्यक्त केली.

घटनेची माहिती आमदार भीमराव केराम यांना देण्यात आली असून, त्यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळ आण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून मृत व जखमींच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याच्या सूचना केल्या. शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही वन विभागान दिली आहे.

उपवनसंरक्षक केशव वाबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, इस्लापूर व बोधडी वनपरिक्षेत्र अधिकारी आण वन कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. वाशिम येथून विशेष पथक पाचारण करण्यात आले असून, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. राज्यात वन्यप्राण्याकडून एकाच वेळी एवढ्या व्यक्तींवर झालेला हा हल्ला ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. त्यामुळ दयाळ धानोरा व परिसरातील शेतकरी वर्गात भीतीच सावट कायम आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *