जिला

जिगळा येथे ह.भ.प.समाधान महाराज यांचे कीर्तन संपन्न

महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज यांनी भाविकांना केले भाऊक

 

 

प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या जिगळा पुनर्वसन रामतीर्थ येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सप्ताहात काल रात्री महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज दौंडकर यांचे कीर्तन संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिगळा क्रमांक दोन येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 12 फेब्रुवारी पासून चालू आहे.

काल ह. भ. प.समाधान महाराज दौंडकर यांचे कीर्तन संपन्न झाले त्यांनी तृतीयपंथी यांची व्यथा व समाज भावना अतिशय मार्मिक शब्दात मांडली. त्यासोबतच जिगळा येथे वास्तव्यास असलेले नांदेड जिल्ह्याचे गुरु माय फरीदा बकस यांनी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सहभाग घेऊन पंगत घेत असतात. यासाठी संपूर्ण जिगळावासीय त्यांना आदरतीर्थ मानत असतात.हा तृतीयपंथीयांचे भाग्य समजावे असे नव्हे तर आमच्या सारख्याना समाजाने नाकारलेल्या लोकांना आपण एकसंघ घेऊन मान सन्मान देता हे फरीदा बकस यांच्या चांगल्या कार्यामुळेच होय.

असे कौतुक व जिगळा वासियांचे आभार ह. भ.प.समाधान महाराज यांनी मानले आहेत. तर परिसरात पहिल्यांदाच तृतीयपंथी कीर्तनकार आल्याने त्यांची वाणी ऐकण्यासाठी रामतीर्थ, नरस, कुंचोली, डोणगाव, टाकळी, यासह अनेक गावातील भाविक भक्त व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जिगळा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहुल जिगळेकर, प्रसिद्ध उद्योजक भास्कर पाटील जिगळेकर,शंकर माली पाटील कानोले,भुजंग माली पाटील कानोले, साईनाथ जिगळेकर, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, पत्रकार अमरदीप गोधने, गणेश पांचाळ,युवा नेते मधुकर पाटील पिसाळे, राम पाटील कानोले, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *