भोकर तालुक्यातील नागपूर येथे आज चौदावी बौद्ध धम्म परिषद
धम्म ध्वजारोहण, प्रबोधनात्मक व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

भोकर, 25- भोकर तालुक्यातील आदर्श गाव नागपूर येथे आज गुरूवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी चौदाव्या बौद्धधम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष सुरेश जोंधळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात येणार असून यावेळी नागपूरचे माजी पोलीस पाटील गंगाधर पाटील शानमवाड, पोलीस पाटील बालाजी पाटील शानमवाड, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रूक्माजी बिरदेवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी साडेअकरा वाजता परिषदेचे उद्घाटन भदंत पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते होणार असून ते उपस्थितांना धम्मदेशना देणार आहेत. सायंकाळी सहा वाजता प्रमुख उपस्थितांचे मनोगत होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बालाजी पाटील सानमवाड हे सभेचे अध्यक्ष राहणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष एल. ए. हिरे उपस्थित राहतील. यावेळी भोकर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भगवानराव दंडवते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगरसेवक विजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागनाथ घिसेवाड, गोविंदबाबा गौड पाटील,
पत्रकार बी. आर. पांचाळ, डॉ. मनोज गिमेकर, डी. पी. कसबे, किशनराव कसबे, इंजि. भारत कानिंदे, शिवाजी पाटील किन्हाळकर, धम्ममित्र गोविंद कसबे, अरुण आळणे, डॉ. सागर जाधव, नरेंद्र काळे, बी. एस. सरोदे, इंजि. सिद्धार्थ पाटील, डॉ. प्रज्वलित सोनकांबळे, भीमराव घुले, एल. एस. कदम, भीमराव दुधारे, पत्रकार जयभीम पाटील, एम. जी. सोनाळे, शासकीय गुत्तेदार गोविंद उल्लेवाड, अॅड. शिवाजी कदम, शेषराव घुले, भीमशाहीर बाबुराव गाडेकर, संगपाल पाटील, श्रीधर घुले, दत्ताभाऊ डोंगरे, राजेश चंद्रे, आर. के. कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान व गायन होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका, सिनेअभिनेत्री व नाट्यकलावंत प्रबोधनकार निशाताई धोंगडे (चंद्रपूर) यांचा गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष गोविंद पाटील शानमवाड, उपाध्यक्ष माजी सरपंच बालाजी उल्लेवाड हे उपस्थित राहणार आहेत. नालंदा बुद्ध विहार समिती, सर्व महिला मंडळ व आदर्श गाव नागपूर यांच्या वतीने धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक सरपंच दत्ता व्यवहारे यांनी दिली. या परिषदेत दुपारी तीन वाजता यश मार्केटिंग, नांदेड यांच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त बंधू-भगिनींनी उपस्थित राहून धम्म परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



