मराठवाडा

अजित वरपुडकर यांची परभणी जिल्हा परिषदेत काँग्रेस गटनेतेपदी निवड

परभणी, दि. 24 फेब्रुवारी – परभणी जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी अजित वरपुडकर यांची अधिकृत निवड करण्यात आली. या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नेतृत्वाला बळ मिळाले आहे. ही निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रभारी अभिजीत देशमुख तसेच जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यासाठी माजी आमदार सुरेश देशमुख आणि माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

निवडीचा अधिकृत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. या वेळी सलमान शेख, आशिष हरकळ, सुहास पंडित, दिगंबर खरवडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित वरपुडकर यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *