क्राईम

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई : दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपी जेरबंद, ३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

 

नांदेड, दि.०६, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ३,००,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुनिल सुधाकर गच्चे (वय २०, रा. आंबेडकरनगर नांदेड), संतोष तुकाराम शेळके (वय २१, रा. श्रावस्तीनगर नांदेड), प्रतिष प्रशांत गजभारे (वय १९, रा. आंबेडकरनगर नांदेड), उरुवेल राहुल सावंत (वय २०, रा. आंबेडकरनगर नांदेड), सोहम आशोक गायकवाड (वय २०, रा. आंबेडकरनगर नांदेड) आणि हर्ष जगदिश कोकरे (वय २२, रा. वसरणी नांदेड) यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना चोरी, घरफोडी व दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११९/२०२६ अन्वये कलम ३१०(२), ११५(२), ३१७(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला असता त्यांना गोपनीय माहिती मिळाली की दरोड्यातील एक आरोपी पावडेवाडी येथील तुलसी पार्क परिसरात वॉचमन म्हणून काम करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव संतोष तुकाराम शेळके असे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या इतर साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. आरोपींकडून एक मोबाईल (१० हजार रुपये), २० हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली, एक तलवार व लोखंडी रॉड असा एकूण ३,००,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करीत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *