जिला
दिव्यांग नेते राहुल साळवे यांना न्यायचक्र गौरव पुरस्कार जाहीर

नांदेड : लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दिला जाणारा न्यायचक्र गौरव पुरस्कार २०२६ नांदेड शहरातील विष्णुनगर येथील दिव्यांग नेते तथा पत्रकार राहुल साळवे यांना जाहीर करण्यात आला आहे.
राहुल साळवे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. येत्या २९ मार्च रोजी नांदेड शहरातील देवकृपा फंक्शन हॉल, छत्रपती चौक, पुर्णा रोड नांदेड येथे लोकजनशक्ती पार्टीचे खासदार अरुण भारती, प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे व संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांच्याहस्ते हा पुरस्कार राहुल साळवे यांना प्रदान करण्यात येणार आहे.



